अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर बसस्थानक आवारातील जळगाव ते शिरपूर बसमधून महिला प्रवासीचे बॅगमधून १ लाख ६ हजार ५०० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि मोबाईल असा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना मंगळवारी ७ मे रोजी सकाळी ८ वाजता घडली आहे. याप्रकरणी सायंकाळी ७ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात आज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, सोनाली अनिल किरमाडे वय 24 रा. कोलाड ता. रोहा जि. रायगड या महिला नातेवाईकांकडे अमळनेर शहरात आलेल्या होत्या. दरम्यान त्या मंगळवारी 7 मे रोजी सकाळी 8 वाजता अमळनेर बसस्थानक येथे शिरपूरला जाण्यासाठी बसमध्ये बसल्या. त्यावेळी अज्ञात चोरट्याने त्यांच्या बँग मधील १ लाख ६ हजार ५०० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि दोन मोबाईल असा एकूण मुद्देमाल चोरून नेल्याचे घटना घडली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर महिलेने तात्काळ अमळनेर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार सायंकाळी ७ वाजता अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष पवार हे करीत आहे.