तुकाराम वाडी परिसरातून तरूणाच्या दुचाकीची चोरी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्‍युज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील तुकाराम वाडी येथे घरासमोर उभी दुचाकी लांबविल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी सोमवार, १० जुलै रोजी रात्री पावणे नऊ वाजेच्या सुमारास एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

जळगाव तालुक्यातील तुकारामवाडी येथे पियुष नंदलाल जैन वय २९ हा तरुण राहतो. तो खाजगी नोकरी करतो. पियुष याने नेहमीप्रमाणे ६ जुलै रोजी रात्री १० वाजता त्याची (एम.एच. १९ डीएफ १८५४) या क्रमाकांची दुचाकी घरासमोर उभी केली होती, दुसऱ्या दिवशी ७ जुलै रोजी सकाळी सव्वा सहा वाजेच्या सुमारास घरासमोर उभी दुचाकी आढळून आली नाही. सर्वत्र शोध घेवूनही दुचाकी आढळून आली नाही अखेर पियुष याने तीन दिवसाानंतर सोमवारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली, या तक्रारीवरुन ३५ हजार रुपये किंमतीची दुचाकी चोरुन नेल्याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक गणेश शिरसाळे हे करीत आहेत.

Protected Content