ओंकारेश्वर व त्र्यंबकेश्वर दर्शनासाठी जाण्यासाठी स्वतंत्र बससेवा सुरू करण्याी मागणी

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल बस आगारातून दर्शनासाठी जाणाऱ्या भक्तांसाठी यावल ते ओंकारेश्वर, उज्जैन (मध्यप्रदेश), व त्रंबकेश्वर (महाराष्ट्र ) ही विशेष बस सेवा करावी, अशी मागणी आश्रय फाउंडेशनचे अध्यक्ष तथा माजी नगरसेवक डॉ कुंदन फेगडे यांनी एका निवेदनाव्दारे आगार व्यवस्थापक दिलीप महाजन यांच्याकडे केली आहे .

निवेदनात म्हटले आहे की, सोमवार पासुन श्रावण मास सुरुवात होत आहे. त्या निमित्याचे यावल ते ओंकारेश्वर (मध्यप्रदेश), उज्जैन (मध्यप्रदेश) त्र्यंबकेश्वर (महाराष्ट्र) या ठिकाणी यावल तालुका व परिसरातुन मोठया संख्येत भाविक खुप श्रद्धेनओंकारेश्वर यात्रा करायला जातात त्यामुळे भाविकांची गैरसोय न होता महामंडळाच्या प्रयत्नातुन सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी यावल आगार व्यवस्थापक प्रमुख दिलीप महाजन यांना निवेदन दिले.

Protected Content