नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान देण्याबाबत निवेदन

अमळनेर लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान देण्यात यावे, या मागणीचे निवेदन जळगाव जिल्हा किसान काँग्रेस कमिटीच्या वतीने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना यांना देण्यात आले.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राज्यात नियमित कर्ज भेट करणारा शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदानापासून अजूनही 40 टक्के पेक्षा जास्त शेतकरी वंचित आहे. यामध्ये जळगाव जिल्ह्यावर देखील अन्याय करण्यात आला आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी व उपनिबंधक यांना या संदर्भात निवेदन देण्यात आले परंतु अद्याप पर्यंत शेतकऱ्यांना अनुदान मिळालेले नाही. या शेतकऱ्यांनी वेळोवेळी कर्जफेड केलेले असून ते कोणत्याही थकबाकीदार शेतकरी यांच्यासाठी असलेल्या योजनेचा लाभ त्यांना मिळालेला नाही. तरी आपण पावसाळ्या अधिवेशनात लक्षवेधी भूमिका मांडून नियमित कर्ज भेट करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान देण्यात यावे, अशी मागणीचे निवेदन अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तसा राष्ट्रीय किसान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील आणि सुरेश पाटील यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना निवेदन देऊन केली आहे.

Protected Content