शेताच्या बांधावरून तरूणाच्या दुचाकीची चोरी

चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चाळीसगाव तालुक्यातील खडकी सिम शिवारातील शेतातून एका तरुण शेतकऱ्याची ४० हजार रुपये किमतीची दुचाकी चोरून नेल्याची घटना ४ जून रोजी दुपारी ४.३० वाजता समोर आली आहे. याबाबत बुधवारी १२ जून रोजी सायंकाळी ५ वाजता मेहुणबारे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत अधिक माहिती अशी की, महेश रंगनाथ कोकंदे वय-34 रा.मेहुनबारे ता. चाळीसगाव हा तरुण आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. शेती करून तो आपला उदरनिर्वाह करत असतो. ४ जून रोजी दुपारी ४.३० वाजता महेश कोकंदे हा त्याची दुचाकी (एमएच 19 सीडी 9393 ) ने चाळीसगाव तालुक्यातील खडकी सिम शिवारात शेतात गेला होता. त्यावेळी त्याने शेताच्या बांधावर दुचाकी पार्किंगला लावली होती. ही दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. ही घटना उघडकीला आल्यानंतर महेशने त्याच्या दुचाकीचा सर्वत्र शोध घेतला, परंतु दुचाकी मिळाली नाही. अखेर त्याने बुधवारी १२ जून रोजी सायंकाळी ५ वाजता मेहुणबारे पोलिसात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांवर मेहुनबारे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल मोहन सोनवणे करीत आहे.

Protected Content