“कोरोना”चे सानुग्रह अनुदान मिळाल्यामुळे तेली परिवाराने आभार मानत केला अधिकाऱ्यांचा सन्मान

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | कर्तव्यावर असताना कोरोना होऊन मृत्युमुखी पडलेल्या कनिष्ठ लिपिकाच्या परिवाराला राज्य शासनातर्फे नुकतेच सानुग्रह अनुदान मिळाले. याबद्दल कर्मचाऱ्याच्या परिवारातर्फे राज्य कामगार विमा सोसायटीच्या अधिकाऱ्यांचे आभार मानून सन्मान केला.

येथील राज्य कामगार विमा सोसायटीचे कनिष्ठ लिपिक शरद सुकलाल तेली हे कर्तव्यावर असताना कोरोना काळात त्यांना कोरोना झाला. उपचार सुरु असताना दि. ९ मार्च २०२१ रोजी त्यांचा मृत्यू झाला होता. राज्य शासनातर्फे कोरोना काळात कर्तव्यावर मृत्यू आलेल्या सरकारी लोकांना ५० लाख देण्यात येत आहेत. या सानुग्रह अनुदानासाठी शरद तेली यांच्या परिवारातर्फे अर्ज करण्यात आला होता. त्यांना अनुदान मिळणेकामी राज्य कामगार विमा सोसायटीचे राज्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी आस्तिककुमार पांडेय, मुंबई येथील प्रशासकीय संचालक डॉ. कोळनूरकर, पुण्याचे वैद्यकीय प्रशासन अधिकारी डॉ. बी. आर. रंगदळ यांच्यासह नाशिक विभागाचे वैद्यकीय प्रशासन अधिकारी तथा जळगाव जिल्ह्याचे प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुहास फालक यांनी सहकार्य केले.

त्यामुळे शरद तेली यांच्या परिवाराला मागच्या आठवड्यात ५० लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान प्राप्त झाले. यामुळे तेली परिवाराने सोमवारी दि. २६ ऑगस्ट रोजी दुपारी राज्य कामगार विमा सोसायटीचे जिल्हा कार्यालयात डॉ. सुहास फालक यांचा शाल, पुष्पगुच्छ देऊन आभार मानीत सन्मान केला. यावेळी तेली परिवाराला सानुग्रह देयक देण्यात आले. प्रसंगी तेली परिवारातील शरद तेली यांच्या पत्नी रेखा तेली, मुलगा सौरभ, मुलगी सलोनी तेली यांच्यासह सोसायटीतील डॉ. दीपेश भोळे, डॉ. गाजिया मिर्जा, डॉ. नेहा पाटील, डॉ. तेजस राणे, डॉ. चंदन महाजन तसेच कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

Protected Content