जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । नशीराबाद येथील के. एस. टी. हायस्कूलमध्ये मुख्याध्यापकाचा पदभार घेण्यावरुन उपशिक्षकाला अडवून शिवीगाळ करत बेदम मारहाण केली तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली, या घटनेप्रकरणी नशीराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
जळगाव शहरातील अक्सानगर भागात उपशिक्षक शेख साबीर अहमद खलीलोद्दीने वय ४८ हे राहतात. ते नशीराबाद येथील के एस टी उर्दू हायस्कूल येथे कार्यरत आहेत. शेख साबीर हे शुक्रवारी सकाळी साडेसात वाजता त्याच्या के एस टी उर्दू शाळेत मुख्याध्यापक पदाचा पदभार घेणार होते, यासाठी ते शाळेत आले असताना त्यांना वसीम अक्रम शेख मुसा. रा. नशीराबाद याने शिवीगाळ करत बेदम मारहाण केली, तु उद्या शाळेत कसा येतो, तुला बघतो असे बोलनू वसीम शेख मुसा याने उपशिक्षक शेख साबीर यांना जीवे मारण्याची धमकीही दिली. अशा आशयाच्या उपशिक्षक शेख साबीर यांच्या तक्रारीवरुन वसीम अक्रम शेख मुसा रा. नशीराबाद याच्याविरोधात शुक्रवारी नशीराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल अतुल महाजन हे करीत आहेत.