चाळीसगाव प्रतिनिधी । येथील गड किल्ले संवर्धनाची चळवळ राबविणाऱ्या सह्याद्री प्रतिष्ठान संघटनेतर्फे रायगड जिल्ह्यातील पद्मदुर्ग किल्ल्यावर नुकताच देशातील सर्वात उंच भगवा ध्वज कायमस्वरूपीसाठी लावण्यात आला आहे. या ध्वजामुळे किल्ल्याच्या सौंदर्यात भर पडली आहे.
सह्याद्री प्रतिष्ठान संघटनेने रायगड जिल्ह्यातील समुद्रात जंजिरा किल्ल्याच्या समोर छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या पद्मदुर्ग किल्ल्यावर (दि.26 डिसेंबर) रोजी देशातील सर्वात उंच भगवा ध्वज कायमस्वरूपी उभारला असून समुद्रकिनाऱ्यावरील पर्यटकांना किल्ल्यावर जाण्यासाठी आकर्षित करण्याचे काम परम पवित्र भगवा कायमस्वरूपी करेल.
फटाके फोडून आनंद साजरा
हा भगवा ध्वज उभारण्यासाठी सह्याद्री प्रतिष्ठानने गेल्या वर्षभरापासून काम हाती घेतले होते. ते (दि.26) डिसेंबर रोजी पूर्णत्वास
गेल्याने संपूर्ण महाराष्ट्रातील सह्याद्री प्रतिष्ठानच्या दुर्ग सेवकांनी आपल्या शहरांमध्ये फटाके फोडून व पेढे वाटून आनंद साजरा केला आहे. सह्याद्री प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्रमिक गोजमगुंडे आणि सहभागी सर्व दुर्ग सेवकांचे अभिनंदन करण्यात आले.
यांची होती उपस्थिती
यावेळी सह्याद्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिलीप घोरपडे, उत्तर महाराष्ट्र प्रमुख शुभम चव्हाण, अजय जोशी, योगेश शेळके, दिपक राजपूत, गणेश पाटील, रामलाल मिस्तरी, पप्पू राजपूत, दिनेश घोरपडे, रवींद्र दुशिंग, वाल्मीक पाटील, जितेंद्र वाघ, सचिन पाटील, राहुल पवार, दिलीप बोराडे, आकाश चव्हाण, आकाश शेळके, रवींद्र मोरे, सुनील कोळी, सागर पंचांग, सचिन घोरपडे, अजय घोरपडे, सोहम येवले, तेजस गुंजाळ, निलेश गुंजाळ, सचिन देवरे, रोहित गुंजाळ, प्रशांत जाधव आणि अतिश कदम यांची उपस्थिती होती.