पारोळा येथे संताजी जगनाडे महाराज जयंतीनिमित्त गुणगौरव समारंभ

 

पारोळा प्रतिनिधी | तालुका प्रदेश तेली महासंघ पारोळा तालुका प्रदेश युवक आघाडी महासंघातर्फे संत संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त उद्या (दि.०८) रोजी दुपारी ४ वाजता तेली समाजाचे नवीन भुवन येथे दहावी, बारावीत ७५ टक्के गुण मिळवलेल्या गुणवंतांचा गुणगौरव सोहळा संपन्न होत आहे.

 

गुणवंतांनी दि. ०७ डिसेंबर पर्यंत गुणपत्रिकेची झेरॉक्स समाजाचे समाजसेवक साहेबराव ठाकरे ( न्हावी), कोमल मेडीकल स्टोअर्स, आझाद चौक, बिजासनी माता पान सेंटर आझाद चौक येथे जमा करावे. दि. ०८ रोजी होणाऱ्या कार्यक्रमास समाजभुषण स्व. केशरकाकू क्षिरसागर, माजी खासदार यांचे सुपूत्र आणि बीड नगरपालिकेचे नगराध्यक्ष डॉ. भारतभुषण क्षिरसागर, प्रदेश तेली महासंघाचे प्रदेशाध्यक्ष तथा नंदूरबार भाजपाचे जिल्हाध्यक्ष विजयभाऊ चौधरी प्रदेश तेली महासंघाचे जिल्हाध्यक्ष आबासाहेब के. डी. चौधरी सर, प्रदेश तेली महासंघाच्या महिला जिल्हाध्यक्षा निर्मलाताई चौधरी, युवक जिल्हाध्यक्ष सुनिल चौधरी, योगेश चौधरीसह तेली समाजाचे आजी-माजी नगरसेवक, पत्रकार, विविध पक्षाचे पदाधिकारी, समाजबांधव आदी उपस्थित राहणार असून या कार्यक्रमाला उपस्थितीचे आवाहन तालुकाध्यक्ष भागवत आधार चौधरी, शहराध्यक्ष प्रविण चौधरी व कार्यकारिणी यांनी केले आहे.

Protected Content