महानायक वेब सीरिज ‘शांताराम’मध्ये झळकणार

मुंबई – महानायक अमिताभ बच्चन डिजिटल प्लॅटफॉर्मवरही दिसणार आहेत. लवकरच ते ‘शांताराम’ या वेबसीरिजमध्ये झळकणार आहेत. 

अमिताभ बच्चन यांचा रविवारी वाढदिवस आहे. सध्या कोरोनावर मात करून ते ‘कौन बनेगा करोडपती’च्या नव्या सत्रात गुंतले आहेत. आता ते डिजिटल प्लॅटफॉर्मवरही दिसणार आहेत. लवकरच ते ‘शांताराम’ या वेबसीरिजमध्ये झळकणार आहेत. ग्रेगरी डेव्हीड रॉबर्टस् यांच्या ‘शांताराम’ या लोकप्रिय कादंबरीवर आधारित ही वेबसीरिज आहे. ही कादंबरी सन २००३ मध्ये प्रकाशित झाली होती. 

ॲप्पल टीवीच्या या वेब सीरीजमध्ये बिग बी एका गुन्हेगाराची भूमिका साकारणार आहेत. या पात्राचे नाम खदर खान आहे. ऑस्ट्रेलियातून निसटून मुंबईच्या झोपडपट्टीत आपले नवीन जीवन सुरू करणार्‍या माणसाची ही कहाणी आहे.

२०२१ पासून या वेब सीरीजचे चित्रीकरण सुरू होईल. मुंबईतील धारावी झोपडपट्टीमध्ये याचे चित्रीकरण केले जाईल अशी सूत्रांकडून माहिती मिळते आहे.

Protected Content