राज्यानेही पेट्रोल – डिझेलवरील कर कपात करावी; भाजप युवा मोर्चाची मागणी

यावल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । राज्यातील महाविकास आघाडी सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत कपात करावी. अशा मागणीचे निवेदन भाजपा युवा मोर्चाचे वतीने यावल तहसीलदार महेश पवार यांना देण्यात आले.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र शासनाने संपूर्ण देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात केली आहे. महाराष्ट्र राज्यातील महाविकास आघाडी शासनाने मात्र पेट्रोल डिझेलचे दर कमी न करता फक्त घोषणा करून राज्यातील जनतेची दिशाभूल केली असल्याचा निवेदनात उल्लेख आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या निषेर्धात निवेदन देण्यात आले. राज्य शासनाने किमान ८ ते १० रुपयांपर्यंत पेट्रोल डिझेलचे दर कमी करावे. अशी मागणी निवेदनाव्दारे करण्यात आली आहे.

या निवेदनावर भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष सागर कोळी, भाजयुवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष अजय भालेराव, भाजपा तालुका सोशल मिडीया प्रमुख पंकज मोरे, भाजयुवा मोर्चाचे तालुका उपाध्यक्ष अॅड. शरद तायडे, नितिन सपकाळे, नितिन कोळी, कन्हैया वारके आणी किरण सावळे यांची स्वाक्षरी आहे.

Protected Content