विमा एजंटची साडेनऊ लाखात फसवणूक करणाऱ्या दोघांच्या मुसक्या आवळल्या !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । ऑनलाईन वेब पोर्टल मधून ट्रेंडिंगमध्ये पैसे गुंतवण्याचे आमिष देऊन ९ लाख ५४ हजार रुपयांची पाचोरा येथील विमा एजंटची ७ महिन्यांपूर्वी ऑनलाइन फसवणूक झाली होती. याप्रकरणी १० फेब्रुवारी २०२४ रोजी जळगाव सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात सायबर पोलीसांनी गुरूवार ६ जून रोजी दुपारी १ वाजता सुरत येथून दोन संशयितांना अटक केली आहे. अल्पेश कांतीभाई कोयाणी (वय ३९, रा. ग्लोबल सिटी, सुरत) आणि संजय भुपतभाई चोपडा (वय ३२, रा. आंबोली, वरियात रोड, सुरत) असे अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, राजेश प्रदीपकुमार संचेती (वय-३९ वर्ष, रा. जामनेर रोड, पाचोरा) यांना ऑनलाईन वेब पोर्टल मधून ट्रेंडिंगमध्ये पैसे गुंतवण्याचे आमिष देऊन ९ लाख ५४ हजार रुपयांची फसवणूक केली होती. १४ नोव्हेंबर ते २३ डिसेंबर २०२३ च्या दरम्यान फिर्यादींच्या मोबाईल क्रमांकावर, व्हाट्सअपवर जेपी मॉर्गन नावाच्या वेब पोर्टल व व्हाट्सअप ग्रुपवरून ट्रेंडिंगमध्ये पैसे गुंतवणूक करण्यास सांगून फिर्यादी यांना सांगितलेल्या वेगवेगळ्या बँकेच्या खात्यामध्ये फिर्यादी यांचे पत्नीच्या नावावर असलेल्या दोन बँक खात्यात संशयित आरोपींनी ९ लाख ५४ हजार रुपये ऑनलाईन रक्कम संशयित आरोपींनी स्वीकारली होती.

मात्र त्यामध्ये कुठलाही फायदा झाला नाही, फसवणूक झाली असे लक्षात येताच फिर्यादी राजेश संचेती यांनी सायबर पोलीस स्टेशनला धाव घेऊन १० फेब्रुवारी २०२४ रोजी तक्रार दाखल केली होती. त्यानुसार अज्ञात संशयित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल होता. सदर घटनेमध्ये सायबर पोलीस स्टेशनने ठाणे मध्यवर्ती कारागृह येथून अल्पेश कांतीभाई कोयाणी (वय ३९, रा. ग्लोबल सिटी, सुरत) आणि संजय भुपतभाई चोपडा (वय ३२, रा. आंबोली, वरियात रोड, सुरत) यांना ताब्यात घेतले आहे. दोघांचाही गुन्ह्यात सहभाग दिसून आला आहे.

Protected Content