Home क्राईम जळके येथील एसबीआय बँक फोडून चोरी करण्याचा प्रयत्न

जळके येथील एसबीआय बँक फोडून चोरी करण्याचा प्रयत्न

0
140

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील जळके गावात एसबीआय बँक फोडून चोरी करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार गुरूवारी १४ मार्च रोजी मध्यरात्री १.३० वाजेच्या सुमारास उघडकीला आला आहे. याप्रकरणी रात्री १० वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव तालुक्यातील जळके गावात एसबीआय बँकेची शाखा आहे. १४ मार्च रोजी मध्यरात्री १.३० वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी बँकेचे मेन गेट आणि मुख्य दरवाजाचे कडी कोयंडा तोडून आत प्रवेश करत चोरी करण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. परंतू चोरांच्या हातात काहीही न मिळाले ते पसार झाले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर बँकेचे प्रभारी अधिकारी अनिल नामदेव ढोले यांनी एमआयडीसी पोलीसात तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून रात्री १० वाजता एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक आसाराम मनोरे हे करीत आहे.


Protected Content

Play sound