शेतातून दोन गुरांची चोरी; ग्रामीण पोलीसात गुन्हा दाखल

चाळीसगाव- लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चाळीसगाव तालुक्यातील पिंप्री शिवारातील शेतातून दोन गुरांची चोरी झाल्याची घटना १२ मार्च रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास उघडकीला आले आहे. याप्रकरणी गुरूवार १४ मार्च रोजी दुपारी दीड वाजता चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रायसिंग बाजीराव पाटील वय ८० रा. पिंप्री ता. चाळीसगाव हे आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. शेतीचे काम करून आपला उदरनिर्वाह करतात. त्यांचे पिंप्री शिवारात शेट गट क्रमांक १८१ मध्ये शेत आहे. ११ मार्च रोजी रात्री १० ते १२ मार्च रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास शेतकरी राजसिंग पाटील यांनी बैल आणि वासरी बांधलेले होते. दरम्यान अज्ञात चोरट्यांनी दोन्ही गुरांची चोरी केल्याचे समोर आले. त्यांनी परिसरात सर्वत्र शोध घेतला परंतू कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर गुरूवार १४ मार्च रोजी दुपारी दीड वाजता चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ गणेश चव्हाण हे करीत आहे.

Protected Content