…यापुढे जळगावप्रमाणे अनेक ‘कार्यक्रम’ होतील : शिवसेना

मुंबई प्रतिनिधी । Jalgaon जळगाव महापालिकेत शिवसेनेला मिळालेली सत्ता ही राज्यभरात चर्चेचा विषय झालेली असून आज याबाबत पक्षाचे मुखपत्र असणार्‍या दैनिक सामनात Dainik Samna भाष्य करण्यात आले आहे. सांगली-जळगावातील करेक्ट कार्यक्रम ही नांदी असून याप्रमाणे पुढे अजून अनेक कार्यक्रम होतील असा सूचक इशारा देखील यात देण्यात आला आहे.

दैनिक सामनामधील Dainik Samna अग्रलेखात आज जळगाव Jalgaon महापालिकेतील विजयाबाबत भाष्य करण्यात आले आहे. यात म्हटले आहे की, सांगलीपेक्षाही करेक्ट कार्यक्रम जळगाव महानगरपालिकेतही झाला असून भाजपच्या २७ नगरसेवकांनी वार्‍याची दिशा ओळखून शिवसेनेचा महापौर व्हावा यासाठी मतदान केले. त्यामुळे उत्तर महाराष्ट्राचे स्वयंभू बादशहा गिरीश महाजन यांना जोरदार धक्का बसला आहे. एकनाथ खडसे यांनी त्यांच्या राजकारणाची, तसेच जळगाववरील वर्चस्वाची चुणूक दाखवली आहे. एकनाथ खडसे व गिरीश महाजन यांच्यात राजकीय वितुष्ट आहे. खडसे यांनी भाजप सोडला त्यामागची जी कारणे आहेत त्यातले प्रमुख कारण गिरीश महाजन हे एक आहेच. जळगाव भाजपचा बालेकिल्ला कधीच नव्हता. महानगरपालिका निवडणुकीत इकडचे-तिकडचे लोक फोडून महाजन यांनी पालिकेत भाजपची सत्ता आणली. महाजन यांचा कारभार एकतंत्री व अहंकारी होता. त्यामुळेच भाजप नगरसेवक कंटाळले होते. महाजन यांचा अहंकार इतक्या टोकाचा की आपल्यात संपूर्ण क्षमता आहे, पक्षाने जबाबदारी दिली तर बारामतीतही विजय मिळवून दाखवतो, अशी भाषा ते करू लागले. इतरांना तुच्छ लेखण्याचा त्यांचा स्वभावच जळगावात भाजपला घेऊन बुडाला आहे.

यात पुढे म्हटले आहे की, सांगली-जळगावात Jalgaon भाजपचा कार्यक्रम एकदम करेक्ट झाला. राज्यात इतर ठिकाणीही अशा करेक्ट कार्यक्रमांचे नियोजन योग्य वेळी होईल. शेवटी सत्ता हेच हत्यार असते व सत्ता हीच संकटमोचक, कवचकुंडले ठरतात. बाकी सारे अहंकार, गर्व व्यर्थ ठरतात. वार्‍यावरची वरात वार्‍याच्या झुळकीबरोबरच नष्ट होते. घाऊक पक्षांतरे करून भाजपने महाराष्ट्रात पक्ष उबदार व गुबगुबीत केला, पण त्याचा पाया भक्कम नव्हता
हे आता दिसून आले.

अग्रलेखात पुढे नमूद केले आहे की, आतापर्यंत भय दाखवूनच भाजपने राजकीय स्वार्थ पाहिला. पोलीस यंत्रणेचा वापर करून ग्रामपंचायतीपासून विधानसभेपर्यंतच्या निवडणुका जिंकल्या. ते भयच आता उरले नसल्याने लोक मुक्तपणे संचार करू लागले आहेत. हा शेवटी सत्तेचाच महिमा असतो. भाजपने हे महिमामंडन केले. त्यामुळे भाजपला आता महाविकास आघाडीकडे बोट दाखवून आदळआपट करण्याची गरज नाही.

यामध्ये शेवटी म्हटले आहे की, सांगलीत, जळगावात सत्ताबदल झाला. त्याला फार मोठे नैतिक अधिष्ठान नसले तरी नैतिक किंवा अनैतिक यावर बोलण्याचा अधिकार भाजपने गमावला आहे. जळगावात भाजप नेत्यांनी दिलेली आश्‍वासने पूर्ण केली नाहीत, असे खडसे यांनी आता सांगितले. मग आता जे सत्तांतर घडवून आणले त्यानुसार ही सर्व आश्‍वासने पूर्ण करा. सत्तापालट कारणी लागो. तरच करेक्ट कार्यक्रम सत्कारणी लागला असे म्हणता येईल. सांगली-जळगावातील करेक्ट कार्यक्रम ही तर नांदी आहे. यापुढे असे अनेक कार्यक्रम होतील! असा इशारा यात देण्यात आलेला आहे.

Protected Content