जळगावच्या बाजारात दुडीचे फुले , कर्टुले या रानभाज्यांची विक्री..!

जळगाव, प्रतिनिधी । पावसाळा नुकताच सुरू झाला आहे. विविध नेहमीच्या पालेभाज्याबरोबरच आता शहरात रानभाज्या व फुलभाज्या विक्रीसाठी उपलब्ध झाल्या आहेत.

पावसाळ्यात दूडीचे फुलं , जंगली भोकरचे चिघुर ,( बारीक हिरवे चिकट दाणे ) , कर्टुले तसेच हादग्याची फुले विक्रीसाठी येत असतात. रानभाज्या व दुडीचे फुलं ही जंगलात अथवा शेताच्या बांधावर नजरेस पडतात. दुडीच्या फूलभाजीचा कंद असतो , त्याला वेल येतो आणि पसरत जाऊन बाभळाच्या झाडावर व इतरत्र वाढतो. आदिवासी , भिल्ल आणि पारधी जमातीचे लोक अशा भाज्या व फळभाज्या तोडून विक्रीसाठी शहरात आणतात. सातपुडाच्या जंगलात तसेच ,जामनेर , रावेर आदी भागात उपलब्ध होत असते .ह्या भाज्या तोडताना काटे , करवंटेचा सामना करावा लागतो.

आयुर्वेदिक गुणधर्म असल्यामुळे या भाज्या आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त आहेत. त्याचप्रमाणे दृष्टिदोष , पोटाचे विकार , पित्त , वात व कफ यासाठी उत्तम आहे. कर्टुले, हादगा सुद्धा बाजारात दिसू लागला आहे. साधारणतः या भाज्यांचे दर ४० ते ५० रुपये पाव आहेत. हंगामी व दुर्मिळ भाज्या या एकदा तरी खाव्यात असे डॉक्टर्ससुदधा सांगत असतात. अशी भाजी ग्राहकांच्या नजरेला लागली की , खरेदी करण्याच्या मोह झाल्याशिवाय राहत नाही.. गेल्या दोन-तीन दिवसांपासून या भाज्या बाजारात नजरेस पडत आहे , भाजी काहीशी महाग असली तरी खरेदी करताना दिसत आहे.

Protected Content