दुकान फोडून प्रिंटर, चार्जर व किराणा मालासह रोकड लांबवली

पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

पाचोरा -लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील निंभोरी बु” येथे मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास  विकास परमेश्वर शेळके यांच्या कृणाल किराणा दुकानाचे शटर अज्ञात चोरट्याने कटरने तोडून आत प्रवेश केला. दुकानातील प्रिंटर, तीन तेलाचे डबे, तिन पिशव्या, चार्जरसह विविध किराणा माल चोरुन अज्ञात चोरटे पसार झाले. घटनेप्रकरणी पिंपळगाव हरेश्वर  पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार दाखल करण्यात आली आहे.

 

पाचोरा तालुक्यातील मोंढाळे ते वाणेगाव मेन रोड लगत असलेल्या निभोंरी बु” गावातील कृणाल किराणा दुकान दुकान मालक विकास परमेश्वर शेळके हे मंगळवारी रात्री आठ वाजता दुकान बंद करून घरी गेले होते. विकास शेळके हे नित्यनियमाप्रमाणे आज २३ रोजी बुधवारी सकाळी ६.४५ वाजता दुकान उघडण्यासाठी आले असता त्यांना सदरचा प्रकार निदर्शनास आला. अज्ञात चोरट्याने कटरने दुकानाचे शटर तोडून विविध वस्तू व किराणा मालाची चोरी करून ड्रावरमधील रोख २ हजार ५०० रुपये चोरी करून पसार झाले. शेळके यांनी पिंपळगाव (हरेश्र्वर) पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून अज्ञात चोरट्यांचा शोध घेणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे.

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content