नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | दिल्लीतील भाजपाच्या कार्यालयात बिहार राज्यातील एनडीएच्या जागावाटप जाहीर करण्यात आले आहे. हे जागावाटप पत्रकार परिषदेत भाजपचे बिहार प्रभारी विनोद तावडे यांनी जाहीर केले. या पत्रकार परिषदेत बिहारचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी, एलजेपी (आर)चे प्रदेशाध्यक्ष राजू तिवारी, राष्ट्रीय लोक मोर्चाचे उपेंद्र कुशवाहसह सर्व मित्रपक्ष उपस्थित होते.
बिहार राज्यात लोकसभेच्या ४० जागा आहेत. यातील जागावाटपात भाजपला १७, नीतीश कुमार यांच्या जनता दल युनाइटेडला १६, चिराग पासवान यांच्या राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्षाला ५, उपेंद्र कुशवाह यांच्या राष्ट्रीय लोक मोर्चा आणि जीतनराम मांझी यांच्या हिंदुस्थान आवामी मोर्चाला प्रत्येकी १ जागा देण्यात आल्या आहेत. बिहारमध्ये लोकसभेच्या ४० जागांसाठी सात टप्प्यांत मतदान होणार आहेत.
औरंगाबाद, मधुबनी, अरिरिया, दरभंगा, मुझफ्फरपूर, महाराजगंज, सारण, उजियारपूर, बेगुसराय, नवादा, पटना साहिब, पाटलीपुत्र, आराह, बक्सर आणि सासाराम या मतदारसंघातून भाजप लढणार आहेत, तर नीतीश कुमार यांचा जनता दल युनाइटेड वाल्मिकीनगर, सीतामढी, झांझारपूर, सुपौल, किशनगंज, कटिहार, पूर्णिया, मधेपुरा, गोपालगंज, सिवान, भागलपूर, बँक, मुंगेर, नालंदा, जेहानाबाद आणि शिवहर या मतदारसंघातून लढणार आहेत. गया ही जागा जीतनराम मांझी यांच्या हिंदुस्थान आवामी मोर्चाला तर काराकाट ही जागा उपेंद्र कुशवाह यांच्या राष्ट्रीय लोक मोर्चाला देण्यात आल्या आहेत.