गिरीश महाजनांची कढी, भाजपचा भात, रस्त्यांची दुर्दशा तशीच

 

जळगाव, प्रतिनिधी । महापालिकेच्या निवडणुकीच्या वेळेस,गिरीश महाजन यांनी महापालिकेमध्ये भाजप पक्षाला सत्ता द्या, मी १०० दिवसात जळगाव शहराचा कायापालट करून टाकेल..” असं खोटं आश्वासन जळगावच्या जनतेला देत जळगावकरांची भरघोस मते घेऊन ५७ नगरसेवक भाजप पक्षाने महापालिकेमध्ये निवडून आणत महापालिका काबीज केली. परंतु १०० काय आता चक्क दोन वर्ष झाल्यानंतर सुद्धा जळगाव शहरातील रस्त्यांवरील एक खड्डा सुद्धा गिरीश महाजन व महापालिकेने बुजविला नाही. उलट खड्ड्यांची खोली ही दिवसेंदिवस वाढत चाललेली असल्याचा आरोप एनएसआययु जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला आहे.

आश्वासन पूर्ण केले नाही, तर विधानसभेच्या वेळी मते मागणार नाही..” असा विश्वास संकटमोचक माजी मंत्री गिरीश महाजन यांनी जळगावच्या जनतेला दिला. मात्र लोकसभा व विधानसभामध्ये चार महिन्याचं अंतर असतानादेखील कुठल्याही प्रकारचं आश्वासन पूर्ण केलं नाही व परत विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस अजून एक खोटं आश्वासन घेऊन जनतेसमोर मते मागण्यासाठी आलेले गिरीश महाजन यांनी “शहरासाठी विशेष २०० कोटीचा निधी आणणार व शहराचा विकास करणार असं खोटं आश्वासन देऊन सतत जनतेला मामा बनवणाऱ्या लाडक्या राजू मामांना निवडून आणले ..अशाप्रकारे सतत केवळ भूलथापा देऊन जनतेची फसवणूक करून केवळ राजकारणाचा व सत्तेचा बाजार मांडून माजी मंत्री गिरीश महाजन यांनी जळगावकरांचा विश्वासघात केला, असेही मराठे यांनी म्हटले आहे.

Protected Content