बहिणाबाई चौधरी विद्यापाठातर्फे विद्यार्थ्यांसाठी २० रुपयात विमा

जळगाव प्रतिनिधी । नव्या शैक्षणिक वर्षात संलग्नित महाविद्यालये, परिसंस्था, प्रशाळा यामध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांचा विद्यार्थी सामुहिक सुरक्षा अपघात मृत्यू विमा योजनेत सहभाग असणे आवश्यक असून महाविद्यालयाने प्रती विद्यार्थी २० रूपये विमा शुल्क एकत्रित करून मुदतीच्या आत विद्यापीठाकडे जमा करावेत असे आवाहन विद्यापीठाचे विद्यार्थी विकास विभागाने केले आहे.

प्रभारी संचालक डॉ. पंकजकुमार नन्नवरे यांनी हे परिपत्रक महाविद्यालयांनाही पाठविले असून विद्यार्थी सामुहीक सुरक्षा अपघात मृत्यू विमा योजनेचे विद्यार्थी समुह अपघात विमा शुल्क प्रती विद्यार्थ्याप्रमाणे आकारून एकत्रित रक्कम ३० सप्टेंबर पर्यंत ई – पध्दतीने जमा करावीत. तर स्वायत्त महाविद्यालयांनी २५ रूपये प्रती विद्यार्थी एकत्रित रक्कम ३१ ऑगस्ट पर्यंत जमा करणे आवश्यक आहे असे या परिपत्रकात म्हटले आहे. सामुहिक विद्यार्थी सुरक्षा अपघात मृत्यू विमा योजनेचे आर्थिक सहाय्य घेण्यास पात्र होण्यासाठीच्या विहीत पध्दतीची माहिती विद्यार्थ्यांना करून द्यावी असेही यात म्हटले आहे.

Protected Content