शाळेच्या खोल्या दुरूस्ती केल्याशिवाय पोषण आहार घेणार नाही; कोरपावली येथील विद्यार्थ्यांचा पवित्रा

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील कोरपावली गावातील जिल्हा परिषद मराठी मुलांची शाळा येथे शाळेच्या खोल्या दुरुस्तीचे काम लवकरात लवकर सुरू करण्यात यावे यासाठी दिनांक ६ डिसेंबर पासुन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेस उपस्थितांच्या हस्ते पूजन करून पुष्पहार अर्पण करीत अभिवादन करीत माजी सरपंच तसेच प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस जलील पटेल यांच्या नेतृत्वाखाली झोपलेल्या अवस्थेत असलेल्या जिल्हा परिषद प्रशासन, पंचायत समिती यावल, शिक्षण विभाग यांना जाग यावी यासाठी तसेच विद्यार्थ्यांच्या शिक्षणाशी निगडीत असलेल्या शाळेच्या खोल्याची तात्काळ दुरूस्तीचे काम सुरू करावे व या कामास दुर्लक्षीत करणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांवर कार्यवाही करण्यात यावी

यासाठी कोरपावलीच्या जिल्हा परिषद शाळेच्या आवारात आंदोलनाला सुरुवात करण्यात आली होती, अखेर या आंदोलनाची पंचायत समितीच्या वतीने उद्यापासुन कामास सुरूवात करण्यात येत असल्याचे कार्य आदेश दिल्याने आंदोलनाची यशस्वी सांगता झाली.

यावेळी आंदोलनात गावचे प्रथम नागरिक सरपंच विलास अडकमोल, व्यवस्थापन समिती अध्यक्ष मुनाफ तडवी, उपाध्यक्ष आसिफ पटेल, गावातील पोलिस पाटील, सलीम तडवी, ग्राम पंचायत सदस्य आरिफ तडवी, युवराज पाटील, अश्रफ तडवी, कोतवाल बबलु महाजन, सलीम तडवी, मोसिन तडवी, पंडित इंधाटे, शाहबाज कुलकर्णी, राजू जहांगीर तडवी, राजू हमीद तडवी, अमान पटेल सह विद्यार्थी, विद्यार्थिनी, पालक, गावकरी या आंदोलना प्रसंगी उपस्थित होते. सदर आंदोलनावेळी शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी जो पर्यंत  आमच्या शाळेच्या खोल्या दुरुस्तीचे काम सुरू होत नाही तो पर्यंत आम्ही शाळेतून मिळणारे पोषण आहार घेणार नाही असा पवित्रा घेतला होता.

अखेर प्रशासनाने या आंदोलनाची दखल घेतल्याने पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी व्ही. सी. धनके व केन्द्र प्रमुख विजय ठाकुर यांनी आंदोलना ठिकाणी भेट देऊन उद्या पासुन या शाळेच्या खोल्या दुरुस्तीच्या कामास सुरूवात करण्या संदर्भातील कार्य आदेश दिल्याने या आंदोलनाची यशस्वी सांगता झाली, या प्रसंगी विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन तथा कृउबाचे संचालक राकेश फेगडे, सरपंच परिषदचे तालुका अध्यक्ष संदीप सोनवणे, काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी उमेश जावळे, समाजसेवक मुक्तार पटेल यांच्यासह आदी मान्यवरांच्या उपस्थितीत या आंदोलना सांगता झाली .

Protected Content