महापरिनिर्वाण दिनानिमित्त पत्रकार संघातर्फे अभिवादन

नांदुरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । नांदुरा तालुका पत्रकार संघाचे वतीने आयोजित करण्यात आलेल्या मिलिंद नगर भागातील मुख्य मार्गावरील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला महानिर्वाण दिना निमित्त पत्रकार संघाच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी पत्रकार संघाचे अध्यक्ष सुरेश पेठकर, उपाध्यक्ष गणेश आसोरे , कोषाध्यक्ष तुकाराम रोकडे , सचिव पुरुषोत्तम भातुरकर ,सदस्य संतोष तायडे ,सदस्य विनोद खंडारे, माजी अध्यक्ष विनोद गावंडे , सदस्य गोपाल ढगे, यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. त्यावेळी बरेच मान्यवर व्यक्ती व पत्रकार संघाचे पदाधिकारी सदस्य हे उपस्थीत होते.

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन हे सर्व सामान्य माणसाच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण आज त्यांचे अपार कष्ट करून सर्व सामान्य माणसाच्या आयुष्यात चागले दिवस आज त्यांचे मुळे अलेले आहे. अश्या महामानवाला अभिवादन करण्यासाठी नांदुरा तालुका पत्रकार संघाचे वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना पत्रकार संघाचे अध्यक्ष सुरेश पेठकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. या कार्यक्रमाला समाज बांधवासह आदींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Protected Content