Home Cities जळगाव गोलाणी मार्केटजवळील मार्ग महापालिकेने पुन्हा केला सील (व्हिडिओ)

गोलाणी मार्केटजवळील मार्ग महापालिकेने पुन्हा केला सील (व्हिडिओ)

0
42

जळगाव, प्रतिनिधी । शहरातील गोलाणी मार्केटजवळ दक्षिणमुखी हनुमान मंदिराजवळ महापालिकेने लावलेले पत्रे अज्ञाताने काढल्याने या मार्गाने रहदारी सुरु झाली होती. याबाबत लाईव्ह ट्रेंड्स न्यूजने वृत्त प्रसिद्द केले असता याची दखल घेत मनपा प्रशासनाने तात्काळ हा मार्ग पुन्हा सील केला.

मनपा प्रशासनाने शहरात होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ठिकठिकाणी पत्रे लावले आहेत. गोलाणी मार्केट जवळ देखील पत्रे लावण्यात आले आहेत. मात्र, हे पत्रे वारंवार अज्ञात व्यक्तींकडून सायंकाळी काढण्यात येत आहेत. शनिवारी देखील असाच प्रकार उघड झाला होता. त्यावेळी पोलिसांनी पत्रे पुन्हा लावून हा मार्ग सील केला होता. आज पुन्हा हा मार्ग अज्ञात व्यक्तीने सुरु केल्याचा प्रकार समोर आला होता. याबाबत लाईव्ह ट्रेंड्स न्यूज ने वृत्त प्रसिद्ध करताच मनपा प्रशासनाने तात्काळ कारवाई करत या मार्गावर पत्रे लावून हा मार्ग सील केला आहे.

 

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/311742166632761/


Protected Content

Play sound