घरासमोरून चालकाची रिक्षा लांबविली

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील माऊली नगर येथील बुलेट शोरूम समोर राहणाऱ्या एका रिक्षा चालकाची प्रवासी रिक्षा चोरून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी चौकशी अंती रात्री ९ वाजता एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, भास्कर गिरीधर ठाकूर वय-५२, रा. माऊली नगर जळगाव हे रिक्षा चालक आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. रिक्षा चालवून ते आपला उदरनिर्वाह करतात. त्यांच्याकडे रिक्षा क्रमांक (एमएच १९ सीडब्ल्यू ८६८) आहे. दरम्यान २ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता त्यांनी त्यांची रिक्षा घराच्या समोर पार्किंग लावली होती. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी ही रिक्षा चोरून नेली. हा प्रकार दुसऱ्या दिवशी ३ एप्रिल रोजी सकाळी ६ वाजता उघडकीला आला. रिक्षाचालक भास्कर ठाकूर यांनी त्यांचे रिक्षाचा सर्वत्र शोध घेतला. परंतु त्यांच्या रिक्षाबाबत कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर गुरुवार ११ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास सहायक फौजदार अतुल वंजारी हे करीत आहे.

Protected Content