सावदा, ता. रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | रावेर तालुक्यातील रोझोदा येथील व्यवसाय नोकरी निमित्त मुंबई आणि परिसरात वास्तव्यास असलेल्या जळगाव जिल्ह्याच्या रावेर तालुक्यातील रोझोदा वासियांचे स्नेहसंमेलन कोपर पश्चिम येथे माजी नगरसेवक सुधाकर धर्मा वायकोळे यांच्या अध्यक्षतेखाली बारा वर्षांनतर नुकताच पार पडला.
रावेर तालुक्यातील रोझोदा येथील मुंबई आणि परिसरात वास्तव्यास असलेल्या नागरिकांचे बारा वर्षानंतर स्नेहसंमेलन कोपर पश्चिम येथील म्हाळसादेवी मंदिर परिसरात १० मार्च रोजी बोंबिवली येथील माजी नगरसेवक सुधाकर धर्मा वायकोळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. याप्रसंगी प्रमुख पाहूणे म्हणून प्रभाकर महादू नारखेडे. डिगंबर रुपा कुंड. नारायण सरोदे.अलका रामेश फेगडे हे उपस्थित होते. यावेळी उपस्थितीनी परिचय दिला. महिलांसाठी सोडत कार्यक्रमातून दहा महिलांना सुनिल नारायण सरोदे यांच्या हस्ते दहा महिलांना साड्या देण्यात आल्या. परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होणार्या मुला मुलींची गौरव करण्यात आला.
विविध उद्योग क्षेत्रात कार्यरत असणार्या उद्योजकांचा परिचय देण्यात येऊन सत्कार करण्यात आला. लहान मुलांनी गीत गायन केले. डॉ. चुडामण वायकोळे व परिवाराच्या वतीने अन्नदान करण्यात राजेंद्र चौधरी यांचा स्वलिखित अमृतवेल कवितासंग्रह सर्व उपस्थितांना सप्रेम भेट देण्यात आला. पुढील वर्षी होणार्या स्नेहसंमेलनासाठी अन्नदाते म्हणून डिगंडर कुंड यांचे नाव जाहीर करण्यात आले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री कामसिध्द मित्र मंडळाचे अध्यक्ष जगदिश नेमाडे, खजिनदार शरद महाजन, सचीव ज्ञानू धांडे. भोजू नेहेते. जयश महाजन, अजय बोंडे, अनिल भारंबे. भागवत बोंडे, हर्षल बोंडे. जगन्नाथ नारखेडे. सुनिल भारंबे, सुचेतन फेगडे. संतोष कुंड. योगेश कुंड. ज्ञानदेव फेगडे यासह अनेक महिला नागरिक उपस्थित होते. सूत्रसंचालन विजय भंगाळे तर आभार प्रदर्शन राजेंद्र चौधरी यांनी केले.