शाहजहांपूर (वृत्तसंस्था) धमकी देत खंडणी मागितल्याच्या आरोपावरून माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते स्वामी चिन्मयानंद यांच्यावर बलात्काराचा आरोप करणाऱ्या विद्यार्थिनीला अटक करण्यात आली आहे.
विशेष तपास टीमकडून (एसआयटी) ही अटकेची कारवाई करण्यात आली आहे. विद्यार्थिनीच्या वकिलाचा आरोप आहे की, एसआयटीने मुलीला चप्पलही घालू दिली नाही आणि जबरदस्ती ओढत रुममधून बाहेर नेत अटक केली. मंगळवारी स्थानिक न्यायालयाने मंगळवारी विद्यार्थिनीची अटकपूर्व जामीन याचिका स्विकारली होती, पण अटकेवर स्थगिती आणण्यास नकार दिला होता. विद्यार्थिनीला वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले आहे. विद्यार्थिनीवर आपल्या मित्रांसोबत मिळून चिन्मयानंद यांच्याकडून पाच कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप आहे.