बाळासाहेबांच्या नातवाचा एकनाथ शिंदे यांना पाठींबा !

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | एकीकडे ठाकरे आणि शिंदे यांच्यात वर्चस्वाची लढाई सुरू असतांना दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नातवाने आज एकनाथ शिंदे यांना पाठींबा दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

काही दिवसांपूर्वीच बाळासाहेब ठाकरे यांच्या सूनबाई स्मीता ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याने राजकीय निरीक्षकांच्या भुवया उंचावल्या होत्या. यानंतर आता त्यांचे पुतणे निहार ठाकरे यांनी शिंदे गटाला पाठींबा जाहीर केला आहे. ते बाळासाहेबांचे सुपुत्र बिंदुमाधव यांचे पुत्र आहे. लक्षणीय बाब म्हणजे ते भाजपचे ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील यांचे जावई देखील आहेत.

निहार ठाकरे यांनी या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ते म्हणाले की, आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन चर्चा केली आहे. बाळासाहेब ठाकरे यांचा विचार एकनाथ शिंदे नक्कीच पुढे घेवून जातील. त्यासाठी माझ्या त्यांना शुभेच्छा आणि पाठिंबा आहे. माझी स्वत:ची लॉ फर्म आहे. त्यामुळे एकनाथ शिंदेंना जी काही लीगल मदत लागेल ती मी देणार असल्याचे निहार ठाकरे म्हणाले. तर सूत्रांच्या माहितीनुसार ते लवकरच राजकीय कारकिर्द सुरू करण्याची शक्यता देखील आहे.

Protected Content