जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलात संजीवन दिनानिमित्त ८ ते १२ डिसेंबर दरम्यान झालेल्या राज्यस्तरीय मुलींच्या फुटबॉल स्पर्धा घेण्यात आला. गुरूवारी १२ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता पुणे संघाने मुंबई संघावर विजय संपादन केला. यात स्पर्धेत उपविजेता मुंबई संघ ठरला तर ठाणे तृतीय व कोल्हापूर चौथ्या स्थानी आला आहे.
संजीवन दिनानिमित्त जळगाव शहरात शिवाजी महाराज क्रीडा संकुलात ८ डिसेंबर ते १२ डिसेंबर या कालावधीत राज्यस्तरीय १६ वर्षाखालील मुलींच्या फुलबॉल स्पर्धा घेण्यात आले. यावेळी राज्यभरातील मुलींच्या संघांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला. १२ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता अंतीम दिवशी मुंबई विरूध्द पुणे असा सामना घेण्यात आला. जिल्हा पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी यांनी नाणेफेक व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. या अंतीम सामन्यात पुण्याचा संघाने मुंबईल संघावर मात करून विजय संपादन केला आहे. त्यामुळे पुण्याचा विजय अंतीम विजयी ठरला आहे.
यावेळी विजयी संघातील खेळाडूंना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले. याप्रसंगी मधु जैन, जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष फारूक शेख, जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक, डॉ. अनिकेत पाटील, जिल्हा क्रीडा कार्यालयातील प्रशिक्षिका चंचल माळी, पिंच बॉटलिंगचे जफर शेख , जिल्हा फुटबॉल संघटनेचे फारुक शेख , डॉक्टर अनिता कोल्हे, एडवोकेट आमिर शेख, अब्दुल मोहसीन, ताहेर शेख यांच्याहस्ते पारितोषिके देण्यात आली.