पाचोरा प्रतिनिधी । जय संघर्ष वाहन चालक सामाजिक संस्थेचे अध्यक्ष व त्यांच्या परिवारास झालेल्या अमानुष मारहाणीच्या निषेधार्थ जय संघर्ष वाहन चालक सामाजिक संस्था, पाचोरा तालुका तर्फे पाचोरा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक व तहसिलदारांना निवेदन देण्यात आले आहे.
यावेळी संस्थेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्रविण वाघ, माधव पाटील, मालुसिंग राठोड, नाना शिंदे, गोपाल पाटील, निलेश कुमावत, मुबारक पिंजारी, योगेश पवार, दिपक पाटील, परमेश्वर पाटील, संजय पाटील, दिपक पवार, कैलास पाटील सह सदस्य उपस्थित होते. जय संघर्ष वाहन चालक सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संजय हाळनोर रा. पुंडलिक नगर, औरंगाबाद यांना दि. ७ आॅगस्ट २०२१ रोजी रात्री ११:३० वाजेच्या सुमारास इंंडस फायनान्स कंपनीचे शाखा अधिकारी यांनी ४ ते ५ गुंडांसह हाळनोर यांच्या घरात घुसून जिवघेणा हल्ला केला. तसेच त्यांच्या ३ महिन्याच्या गर्भवती सुनेला मारहाण करून जखमी करत दागिणे पळविले व त्यांच्या मुलांना देखील यावेळी जबर मारहाण करण्यात आली आहे.
अशा गुंड प्रवृत्तीच्या फायनान्स कंपनीचे अधिकारी व त्यांचे सोबतच्या गुंडांना तात्काळ अटक करुन त्यांचे विरुध्द कठोर कारवाई व्हावी या मागणीचे निवेदन पाचोरा तालुका जय संघर्ष वाहन चालक सामाजिक संस्थेतर्फे पाचोरा पोलिसांना व तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले आहे.