अत्यंत कमी रक्त असलेल्या गर्भवती आई व बाळाला मिळाले डॉक्टरांच्या सतर्कतेने जीवनदान

जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | कमल हॉस्पिटल व मॅटर्निटी होम जामनेर येथे अत्यंत कमी रक्त असलेल्या गर्भवती महिलेला व बाळाला डॉक्टरांच्या सतर्कमुळे जीवनदान मिळाले. ०९ मार्च २०२४ रोजी मध्यरात्री गर्भवती महिला शितल परदेशी (रा. वाकडी) कमल हॉस्पिटल व मॅटर्निटी होम येथे प्रसुती कळा आल्यावर दाखल झाली. ती आठ महीन्यांची गर्भवती होती तिचे रक्त फक्त ५ ग्राम एवढेच होते. याआधी पहिल्या प्रसुतीमध्ये तीचे सीझर ऑपरेशन झालेले होते. यावेळेस ही तिला सीझर ऑपरेशची गरज होती. पण ५ ग्राम एवढ्या कमी रक्तामध्ये ऑपरेशन करणे कठीण होते. स्त्रीरोग तज्ञ डॉ. गिरीधारी जेधे यांनी हे सिझर करण्याचा धाडसी निर्णय घेतला.

कमल हॉस्पिटलचे संचालक डॉ. प्रशांत भोंडे यांनी जामनेर येथील मीरा ब्लड स्टोरेज व जळगाव येथी रेड प्लस रक्त केंद्र येथून त्वरित रक्त उपलब्ध करून दिले. भूलरोग तज्ञ डॉ. दीपक ठाकूर यांनीही एवढ्या कठीण सीझर ऑपरेशन साठी भूल देण्यास संमती दर्शवली. ९ मार्च २०२४ मध्यरात्री हे अत्यंत कठीण सीझर ऑपरेशन कमल हॉस्पिटल व मॅटर्निटी होमे जामनेर येथे पार पडले. त्यात गोंडस मुलाचा जन्म झाला. सदर ऑपरेशन मध्ये संचालक डॉ. प्रशांत भोंडे, स्त्रीरोग तज्ञ डॉ. गिरधारी जेधे, भूलरोग तज्ञ डॉ. दीपक ठाकूर, बालरोग तज्ञ डॉ. निलेश काळे व हॉस्पिटलमधील सर्व कर्मचाऱ्यांचा सहभाग होता. ५ दिवसानंतर महिलेची व बाळाची सुट्टी करण्यात आली.

Protected Content