नाशिकमधून शिंदे गटाकडून हेमंत गोडसे यांना उमेदवारी जाहिर

नाशिक-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | शिवसेना शिंदे गटाकडून हेमंत गोडसे यांना पुन्हा एकदा नाशिकमधून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी १२ मार्च रोजी जाहीर सभेतून ही घोषणा केली आहे. परंतू शिंदे गटाचा मित्र पक्ष भाजपची यावर कुठलीही प्रतिक्रिया आलेली नाही आहे. भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने महायुतीकडून आधी जागा निश्चिती व त्यानंतर उमेदवारांची नावे निश्चित होतील.

उमेदवारांची नावे जाहीर करताना महायुतीच्या घटक पक्षांतील सर्व ज्येष्ठ नेते व्यासपीठावर राहतील. भाजप मेळाव्यातही आम्हीही आमच्या उमेदवाराची नावे जाहीर करू शकतो, मात्र त्याला अर्थ नाही. त्यामुळे भाजपमध्ये नाराजीचा सुरू पाहायला मिळत आहे. अनेक दिवसांपासून भाजपला नाशिकची जागा सोडली जाईल किंबहुना भाजप पदाधिकाऱ्यांकडूनही नाशिकच्या जागेचा आग्रह धरला जात होता. नाशिकची जागा शिवसेनेला मिळेल की नाही शिवसेना मिळाली तर खासदार गोडसे यांना पुन्हा उमेदवारी मिळेल की नाही याबद्दल तर्कवितर्क लावले जात होते.

खासदार डॉ. शिंदे यांच्या उपस्थितीत मंगळवारी ग्रामीणमध्ये विविध विकास कामांचे उद्घाटन व नाशिक शहरामध्ये दादासाहेब गायकवाड सभागृहात कार्यकर्ता संवाद मेळाव्याचे आयोजन केले होते. हेमंत गोडसे यांना उमेदवारी मिळाल्यास नाशकात दोन्ही शिवसेना आमनेसामने येतील, कारण शिवसेना ठाकरे गटाकडून विजय करंजकर यांचा नाव निश्चित मानला जात आहे

Protected Content