रेकॉर्डवरील गुन्हेगाराला पकडण्यासाठी गेलेल्या पोलीसांना धक्काबुक्की; ४ जणांवर गुन्हा दाखल

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । रेकॉर्डवरील गुन्हेगाराला पळून जाण्यास सहकार्य करत पोलीसांशी धक्काबुक्की केल्याची घटना गुरूवारी शहरातील तांबापूरा परिसरात घडली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

एमआयडीसी पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, जळगाव शहरातील तांबापूरा परिसरात रेकॉर्डवरील गुन्हेगार इश्तीयाक अली राजीक अली हा आई, भाऊ आणि बहिणीसोबत वास्तव्याला आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक जयपाल हिरे यांनी गुन्हेगार इश्तीयाक अली याला पोलीसात हजर करण्याच्या सुचना दिल्या. त्यानुसार गुरूवारी १० ऑगस्ट रोजी दुपारी सव्वा एक वाजेच्या सुमारास एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, पोहेकॉ अल्ताफ पठाण, राहूल रगडे, विशाल कोळी, चंद्रकांत पाटील, महिला पोलीस नाईक निलोफर सैय्यद हे तांबापूर येथे गेले. त्यावेळी पोलीसांना पाहून इश्तीयाक अली याची आई हसीना राजीक अली हिने पोलीसांना शिवीगाळ केली. तर त्याच्या सोबत राहणारा अनिस पटेल आरडाओरड करत पोलीसांना धक्काबुक्की केली. तर इश्तीयाकची बहिण नाजीया हिने गुन्हेगाराला पळवून जाण्यासाठी सहकार्य केले. पोलीसांशी धक्काबुक्की करत शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी पोहेकॉ अल्ताफ पठाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून इश्तीयाक अली राजीक अली, हसीना राजीक अली, नाजीया आणि अनिस पटेल सर्व रा. तांबापूरा यांच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content