कोल्हापूर (वृत्तसंस्था) पबजी गेमच्या अति आहारी गेल्यामुळे कोल्हापूरमधील एका तरुणाचे मानसिक संतुलन बिघडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चिंताजनक म्हणजे या तरुणाची प्रकृती अत्यवस्थ आहे.
या संदर्भात अधिक असे की, इंद्रजित कोळी (वय-20, रा. पोर्ले, ता.पन्हाळा) हा महाविद्यालयीन विद्यार्थी आहे. इंद्रजीत तो मोबाइलवर सातत्याने पबजी गेम खेळत होता. गेल्या काही दिवसांपासून तो कोणाशी जास्त बोलत नव्हता. परंतू शनिवारी इंद्रजित अचानक आरडाओरडा करू लागला. त्यामुळे घाबरलेल्या आई-वडिलांनी त्याला तात्काळ सीपीआरमध्ये उपचारासाठी आणले. डॉक्टरांनी इंद्रजीतकडून मोबाइल काढून घेतल्यावर त्याने त्यांच्याशी वाद घातला. नंतर तो काही तासांतच घरी निघून गेला. मोबाइल गेमचा अतिरेक झाल्याने इंद्रजितवर ही परिस्थिती ओढवली असल्याचे डॉ. विजय बारणे यांनी सांगितले आहे. इंद्रजितवर योग्य वेळेत उपचार होणे गरजेचे असल्याचेही डॉक्टरांचे म्हणणे आहे. दरम्यान, इंद्रजितचे आई-वडील शेतकरी असून त्याच्या घरची परिस्थिती हलाखीची आहे.