पातोंडा “क्लस्टर” मुळे होणार परिसराचा कायापालट-खा. उन्मेश पाटील

चाळीसगाव प्रतिनिधी । केंद्र सरकारने शामाप्रसाद मुखर्जी रुरबन मिशन अभियानांतर्गत पातोंडा, न्हावे-ढोमणे,टेकवाडे, बहाळ या परिसरात विविध कामांना मंजुरी दिली असून आज साडे बारा कोटी रुपयांचा निधी या योजनेसाठी प्राप्त झाला आहे. 

या अंतर्गत  55  विविध कामे या परिसरात होणार असून यात प्रामुख्याने अंतर्गत गटारी,गावांतर्गत रस्ते जोडणी, स्मशानभूमींची सुधारणा, गाव हाळ तयार करणे, ग्रेडिंग पॅकिंग शेड बांधणे, शीतगृहाची निर्मिती करणे, पशुवैद्यकीय दवाखाना सुधारणा त्यांना वॉल कंपाउंड करणे. बाजार ओटे बांधणे, बहुउद्देशीय हॉल बांधणे, अंगणवाडी सुधारणा त्यांना वॉल कंपाऊंड करणे, शालेय इमारत दुरुस्ती ,विद्यार्थ्यांसाठी खेळाचे मैदान तयार करणे साहित्य खरेदी जिमखाना तयार करणे, शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी आर ओ प्लांट बसविणे, प्राथमिक आरोग्य केंद्रे इमारती सुधारणा या सर्व विविध पंचावन्न विकास कामांचा सुरूवात केली जाणार असून आज या गावांच्या सरपंच उपसरपंच पदाधिकारी ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत कामांना लवकरच सुरुवात करण्यात येणार असून पातोंडा, न्हावे-ढोमणे,टेकवाडे, बहाळ येथील नियोजित पातोंडा “क्लस्टर” मुळे होणार परिसराचा कायापालट होणार असल्याची भावना खासदार उन्मेश दादा पाटील यांनी व्यक्त केली आहे. 

आज खासदार जनसंपर्क कार्यालयात सकाळी अकरा वाजता उन्मेश पाटील यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली.यावेळी गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर, पंचायत समितीचे उपसभापती भाऊसाहेब पाटील, पातोंडा सरपंच बापू महाजन, उपसरपंच दिपक देसले पाटील, बहाळ सरपंच राजेंद्र मोरे , उपसरपंच प्रमोद पाटील, टेकवाडे सरपंच वाल्मिक पाटील, टेकवाडे उपसरपंच राजू भिल्ल, न्हावे ढोमणे सरपंच किशोर पाटील ढोमणेकर,उपसरपंच दिपक पाटील, पातोंडा ग्रामसेवक एस. पी. मोरे, टेकवाडे ग्रामसेवक महाले, न्हावे ग्रामसेवक हिरामण पाटील, बहाळ ग्रामसेवक सूर्यवंशी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. 

सुरुवातीला गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर यांनी या योजनेसाठी मार्गदर्शक तत्त्वे केंद्र सरकारने घालून दिली असून राज्यस्तरीय उच्चाधिकार समितीने दिलेल्या डीपीआर नुसार या कामांना प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे. अतिशय गुणवत्तापूर्वक ही कामे होणार असून यासाठी सरपंच उपसरपंच ग्रामसेवक सर्व यंत्रणेने ही कामे लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी सहकार्य करावे. अशी अपेक्षा बि.डि.ओ. नंदकुमार वाळेकर यांनी आपल्या प्रास्ताविकात व्यक्त केली. 

यावेळी आपली भावना व्यक्त करतांना पातोंडा सरपंच बापू महाजन यांनी विकास कामामुळे आमच्या गावाचा वैभवात भर पडणार असून ही कामे दर्जेदार व्हावीत. यासाठी आम्ही गावकरी जागरूक राहू. खासदार उन्मेश पाटील यांच्या प्रयत्नातून या सुविधा निर्माण झाल्यानंतर आम्ही शहरांशी स्पर्धा करू ही विकासाची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आम्ही सर्व सरपंच उपसरपंच पदाधिकारी खासदार उन्मेश दादा पाटील यांचे जाहीर आभार मानतो अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

खासदार उन्मेश दादा पाटील पुढे की म्हणाले की केंद्र शासनाच्या श्यामाप्रसाद मुखर्जी रूर्बन मिशन अंतर्गत देशातील ग्रामीण भागातील गावांच्या समाजाच्या आर्थिक, सामाजिक, भौतिक विकास करणे आणि शहराप्रमाणे पायाभूत सुविधा पुरवायच्या असल्याने यामध्ये कृषी आणि कृषी संलग्न असणाऱ्या क्षेत्रांना विशेष प्राधान्य देण्यात आले आहे आज सुमारे 97 कोटी रुपयांच्या कामांपैकी 12 कोटी 50 लाख रुपयांचा निधी प्राप्त झाल्याने या गावांचा परिसराचा चौफेर विकास होणार आहे. अशी माहिती खासदार उन्मेशदादा पाटील यांनी यावेळी व्यक्त केली.

 

 

Protected Content