यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील मनवेल येथील रहिवासी किरण पंकज पाटील यांच्या चौथ्या पुण्यस्मरणार्थ पाटील कुटुंबातील सुनेच्या वतीने जिल्हा सामान्य रुग्णालयातील रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना भोजनाचे पाकीट वाटप करण्यात आले.
मनवेल येथील रहिवासी पंकज साहेबराव पाटील यांची पत्नी किरण पंकज पाटील यांचे ४ वर्षापूर्वी अल्पशा आजाराने निधन झाले आहे. त्यांच्या आठवणीनां उजाळा देत दरवर्षी दिवाळीच्या सण साजरा नकरता पाटील यांच्या वतीने त्यांच्या पत्नीच्या पुण्यस्मरणार्थ दरवर्षी विविध सामाजिक उप्रक्रम राबविण्यात येत असतात. यात अन्नदान, फराळ वाटपासह विविध सामाजिक उपक्रमांचा सहभाग असतो. यानुसार आज शनिवार दि. २२ ऑक्टोबर रोजी जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये उपचार घेत असलेल्या गोरगरीब रुग्ण व त्याच्या नातेवाईक अशा २०० जणांना सामाजिक बांधिलकीतुन अन्नदान करण्यात आले. या सामाजिक उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. या कार्यक्रमास यशस्वी करण्यासाठी महेंद्र पाटील, कवी प्रफुल्ल नाना पाटील, पंकज पाटील, दिनेश जाधव, रमाकांत पवार, रमेश शुशीर, महेंद्र राजपूत, आरुण राजपूत, भरत पवार यांनी कामकाज पाहिले.