पाचोरा, प्रतिनिधी | आमचे शासनात विलीनीकरण करावे हीच मागणी असून आमची ही मागणी जोपर्यंत मान्य केली जात नाही तोपर्यंत आमचे हे दुखवटा आंदोलन सुरुच राहणार असल्याचे पाचोरा आगारातील कर्मचारी यांनी सांगितले.
याविषयी सविस्तर माहिती अशी की, राज्यात गेल्या ८ नोव्हेंबर पासुन एस. टी. महामंडळाचे कर्मचारी संपावर गेले असून नुकतेच राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी कर्मचाऱ्यांना तुटपुंजी पगार वाढ केल्याची घोषणा केली. मात्र आमची पगार वाढीची मागणी नव्हतीच फक्त आमचे शासनात विलीनीकरण करावे हीच मागणी असुन आमची ही मागणी जोपर्यंत मान्य केली जात नाही तोपर्यंत आमचे हे दुखवटा आंदोलन सुरुच राहणार असल्याचे पाचोरा आगारातील कर्मचारी यांनी सांगितले.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/910291372924147