अंत्योदय अन्न योजनेतील लाभार्थ्यांसाठी भरडधान्याचे वाटप

जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यातील पणन हंगाम 2019-20 (रब्बी) अंतर्गत खरेदी केलेले भरडधान्य (ज्वारी व मका) सार्वजनिक वितरण व्यवस्थेतंर्गत वाटप करण्याबाबत शासनाचे निर्देश आहेत. सदरचे भरडधान्य गव्हाचे परिमाण कमी करुन त्याच प्रमाणात भरडधान्य (ज्वारी व मका) वाटप करण्याच्या सुचना आहेत. 

त्यानुसार माहे ऑक्टोबर 2020 च्या नियतनात भरडधान्य (ज्वारी व मका) अंत्योदय अन्न योजना कार्डधारकांना वितरीत करण्यात येणार आहे. त्यानुसार अंत्योदय अन्न योजना कार्डधारकांसाठी  गहू 10 कि.ग्रॅ. दोन रुपये प्रती किलोप्रमाणे, ज्वारी 5 कि.ग्रॅ. एक रुपये प्रती किलोप्रमाणे व मका 10 कि.ग्रॅ. एक रुपये प्रती किलो प्रमाणे व तांदुळ 10 कि.ग्रॅ. तीन रुपये प्रती किलोप्रमाणे या दराने प्रति कार्ड ऑक्टोबर 2020 करिता रेशन दुकानातुन लाभार्थ्यांना वाटप करण्यात येणार आहे याचा पात्र लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा. असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

 

Protected Content