संविधान दिनानिमित्त फैजपूर येथे अभिवादन

फैजपूर प्रतिनिधी | राज्यघटनेविषयी माहिती, सरनामा, मूलभूत हक्क, मूलभूत कर्तव्ये व मार्गदर्शक तत्वे या संदर्भात जागृती व्हावी या उद्धेश्याने संविधान दिनानिमित्त फैजपूर येथे कार्यक्रम संपन्न झाला.

फैजपूर शहरातील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारक व नगर परिषद येथे संविधान निर्माते डॉ.बाबसाहेब आंबेडकर अभिवादन करून संविधानाचे वाचन करण्यात आले. यावेळी नगराध्यक्षा महानंदा होले , गटनेते व नगरसेवक मिलिंद वाघुळदे, नगरसेवक रशिद तडवी, समाज सेवक रवीन्द्र होले, इरफान मेंबर रियाज मेंबर, अभियंता फारूकी, सुरज नारखेडे, शिवा नेहेते व न पा कर्मचारी वृंद यांची उपस्थिती होती

Protected Content