जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील नवीन बसस्थानक आवारातून एका वृद्धाचा २० हजार रुपये किमतीचा मोबाईल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना २२ मे रोजी दुपारी ४ वाजता घडली होती. याप्रकरणी चौकशी अंती अखेर रविवारी २ जून रोजी रात्री ८ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत अधिक माहिती अशी की, फयाज अहमद शेर अहमद पठाण वय-६३, रा. धुळे हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. दरम्यान २२ मे रोजी ते कामाच्या निमित्ताने जळगाव शहरात आलेले होते. काम आटोपून ते दुपारी ४.३० वाजता धुळे येथे जाण्यासाठी जळगावातील नवीन बसस्थानकात आले. त्यावेळी अज्ञात चोरट्याने त्यांचा जवळील २० हजार रुपये किंमतीचा महागडा मोबाईल चोरून नेला. ही घटना घडल्यानंतर त्यांनी सर्वत्र शोध घेतला. परंतु मोबाईल संदर्भात कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर रविवार २ जून रोजी रात्री ८ वाजता जिल्हापेठ पोलिसात तक्रार देण्यात आली. त्यानुसार अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा पुढील तपास महिला पोलीस हेडकॉन्स्टेबल वंदना राठोड ह्या करीत आहे.