Home क्राईम वृध्दाची दुचाकी चोरट्यांनी लांबविली

वृध्दाची दुचाकी चोरट्यांनी लांबविली


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील संचार नगरात राहणाऱ्या वृध्दाची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना १० फेब्रुवारी रोजी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास उघडकीला आले आहे. याप्रकरणी रविवारी ११ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक असे की, एकनाथ यशवंत पाटील वय ६२ रा. संचार नगर, जळगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. त्यांच्या घरासमोर त्यांनी ९ फेब्रुवारी रोजी रात्री १० वाजता त्यांची दुचाकी क्रमांक (एमएच १९ सीक्यू ९७९७) ही त्यांच्या समोर पार्कींगला लावलेली होती. अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री ही दुचाकी चोरून नेली.

हा प्रकार दुसऱ्या दिवशी १० फेब्रुवारी रोजी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास उघडकीला आली. एकनाथ पाटील यांनी चोरीला गेलेली दुचाकीचा सर्वत्र शोध घेतला परंतू दुचाकीबाबत कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर रविवारी ११ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजता त्यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली.त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ गणेश शिरसाळे हे करीत आहे.


Protected Content

Play sound