जळगावातील वृध्दाने मृत्यूला कवटाळले!

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील गजानन नगरात राहणाऱ्या ६१  वर्षीय वृध्दाने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी १ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास उघडकीला आली आहे. याप्रकरणी आत्महत्या करण्याचे कारण समजू शकले नाही.  एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सैय्यद मसूद अख्तर (वय-६१) रा.खेडी पेट्रोल पंपजवळ, गजानन नगर, जळगाव असे मृत वृध्दाचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरानजीक खेडी पेट्रोल पंपाजवळील गजानन नगरात सैय्यद अख्तर हे दोन मुले आणि पत्नीसोबत वास्तव्याला होते. मंगळवारी १ ऑगस्ट रोजी त्यांच्या नात्यातील एका महिलेचा मृत्यू झाला होता. त्यामुळे त्यांच्या घरातील मंडळी महिलेच्या घरी गेले होते. त्यामुळे ते दुपारी घरी एकटेच होते. त्यांनी राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली. दुपारी तीन वाजेच्या सुमारास त्यांचा मुलगा रमीझ अख्तर हा कंपनीतून कामावरून घरी आला. त्यावेळी हा प्रकार लक्षात आला. त्यांना तातडीने खाली उतरवून जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन पाटील यांनी मृत घोषीत केले. आत्महत्या करण्याचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील प्राथमिक तपास पोकॉ अल्ताफ पठाण आणि शाबाद सैय्यद हे करीत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी शाहीनाबी, मुलगा मुबश्शीर, रमीझ आणि मुलगी असा परिवार आहे.

 

Protected Content