महसूल दिनानिमित्त उत्कृष्ट सेवा देणाऱ्या महसूल कर्मचाऱ्यांचा सत्कार

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल येथे तहसील कार्यालयात महसुल दिना निमित्त आयोजीत महसुलच्या उत्कृष्ठसेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांचा या कार्यक्रमा सन्मान करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रांत अधिकारी कैलास कडलग हे होते तर प्रमुख मान्यवर म्हणुन तहसीलदार श्रीमती मोहनमाला नाझीरकर, निवासी नायब तहसीलदार संतोष विंनते , नायब तहसीलदार मनोज थारे, पुरवठा अधिकारी अर्चना भगत यांच्यासह आदी महसुलचे कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी प्रांताधिकारी कैलास कडलग यांनी मार्गदर्शन करतांना म्हणाले की, महसुलच्या प्रशासकीय सेवेत कार्य करीत असताना कर्तत्व व आणी शिस्तीचे पालन करीत सर्वसामान्य गोरगरीब नागरीकांची शासनाच्या संजय गांधी योजना आणी पुरवठा विभागाच्या माध्यमातुन धान्य वितरण करीत कर्मचाऱ्यांनी सेवा करावी असे सांगितले.

यावेळी महसुलच्या विविध विभागात  आपली उत्कृष्ठसेवा देणाऱ्या कर्मचारी आणी अधिकारी यांचा सन्मान करण्यात आले. यात निवासी नायब तहसीलदार संतोष विंनते, सचिन जगताप( मंडळ अधिकारी ), बबीता चौधरी ( मंडळ अधिकारी) ,महसुल सहाय्यक भाग्यश्री इंगळे, पुरवठा निरिक्षक अंकिता वाघमुळे, तलाठी तेजस पाटिल व टेमरसिंग बारेला, कोतवाल दिपाली संतोष बारी, संगोयोचे अव्वल कारकुन सकावत तडवी, शिपाई युनुस खान आणि सलीम शेख यांच्यासह डाटा एन्ट्री ऑपरेटर संतोष पाटील, पराग सरोदे, स्नेहल फिरके यांचा प्रशस्तीपत्र देवुन सन्मान करण्यात आला. यावेळी  रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते , या शिबीरात प्रांत अधिकारी कैलास कडलग, निवासी नायब तहसीलदार संतोष विंनते , यावलचे तलाठी ईश्वर कोळी यांच्यासह आदी महसुलच्या कर्मचाऱ्यांनी रक्तदान केले.

Protected Content