महेलखेडी निवडणूक : महिला उमेदवारांचा नारळ वाढवून प्रचारास प्रारंभ

 

यावल, प्रतिनिधी ।तालुक्यात ग्राम पंचायत निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी उडाली आहे. मतदानाची वेळ जवळ येत असल्याने प्रचारात रंगत आली असतांना महेलखेडी गावातील विविध प्रभागातील महिलांनी हनुमान मंदिरात एकत्र येत नारळ वाढवून हनुमंतास विजयी करण्याचे साकडे घातले.

महेलखेडी ग्रामपंचायतीच्या एकूण ७ जागांसाठी एकूण १८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. प्रभाग क्रमांक १मधुन ओबीसी प्रवर्गातील महिला बिनविरोध निवडून आल्याने आता एकूण १७ जण रिंगणात आहेत. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी गावातील प्रभाग १ मध्ये अनु जमाती महिला राखीव असून ही निवडणुक लक्ष वेधणारी आहे. दोन महिला रिंगणात तर सर्वसाधारण पुरुष या१ जागेसाठी ४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आपले नशीब आजमावत आहेत. यातील कुंदन पाटील यांनी धनराज सुधाकर पाटील यांना आपला पाठिंबा जाहीर केल्याने आता तिरंगी लढत होणार असून सर्वांचे लक्ष प्रभाग १ मधील निवडणुकीने वेधून घेतले असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

Protected Content