मुंबई प्रतिनिधी । आज राज्यात कमी रुग्णांची नोंद झाली असून, दिवसभरात नव्या रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांचे प्रमाण अधिक राहिले. आज दिवसभरात राज्यात तब्बल ११ हजार ३९१ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, आज दिवसभरात राज्यामध्ये ८ हजार ४९३ नवे रुग्ण सापडल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
महाराष्ट्रात करोनाचे ८ हजार ४९३ नवे करोना रुग्ण आढळले आहेत. तर २२८ रुग्णांचा मागील २४ तासांमध्ये करोनामुळे मृत्यू झाला आहे. ११ हजार ३९१ रुग्णांना मागील २४ तासांमध्ये डिस्चार्ज देण्यात आला आहे. महाराष्ट्रातील करोना रुग्णांची संख्या आता ६ लाख ४ हजार ३५८ इतकी झाली आहे. यापैकी ४ लाख २८ हजार ५१४ रुग्णांना आत्तापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर २० हजार २६५ रुग्णांचा आजवर मृत्यू झाला आहे. सध्याच्या घडीला महाराष्ट्रात १ लाख ५५ हजार २६८ अॅक्टिव्ह केसेस आहे. माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.