देशातील कोरोनाच्या संसर्गात वाढ; रूग्ण वाढले पण मृत्यू दर कमी

नवी दिल्ली वृत्तसंस्था । देशातील कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत असून आता जवळपास दोन सेकंदाला एक इतक्या गतीने रूग्ण आढळून येत आहे. तथापि, मृत्यू दर कमी होऊन २.३७ टक्के झाल्याची बाब देखील समोर आली आहे.

काल (बुधवारी) एका दिवसात आतापर्यंतचे सर्वाधिक ४८,२९४ रुग्ण आढळले. म्हणजे, दर २ सेकंदाला १ रुग्ण. देशात आतापर्यंत एकूण १२.३४ लाख लोकांना हा संसर्ग झाला आहे. तसेच काल एकाच दिवशी ६९९ जणांचा मृत्यू झाला. दरम्यान, देशात आतापर्यंत ३० हजार मृत्यू झाले आहेत. तथापि, मृत्युदर कमी होऊन २.३७% झाला आहे. एकूण बाधितांपैकी ७.७९ लाख रुग्ण बरे झाले आहेत. रिकव्हरी रेट ६३.१% झाला आहे.

महाराष्ट्रात बुधवारी आतापर्यंतचे सर्वाधिक १०,५७६ रुग्ण आढळले. राज्यात एकूण ३.३७ लाख रुग्ण झाले असून दुसरे सर्वाधिक बाधित राज्य तामिळनाडूत ५,८४९ नवे रुग्ण आढळले. येथे एकूण १.८६ लाख रुग्ण आहेत. तर, अहमदाबादमध्ये ४९% लोक कोरोनाबाधित असल्याचे ११ कोरोना संसर्गित शहरांमधील कन्टेनमेंट झोनमध्ये केलेल्या सर्वेक्षणातून दिसून आले आहे.

Protected Content