जळगाव प्रतिनिधी । आज जिल्ह्यात २५६ नवीन रुग्ण कोरोना वर मात करून घरी परतले असून यामुळे आजवर कोरोना संसर्गातून मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या पन्नास हजाराच्या पार केलेली आहे.
जळगाव जिल्ह्यात आज 178 नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत तर यासोबत आज 256 रुग्णांनी कोणावर मात केलेली आहे. आजच्या आकडेवारीचा विचार केला असता जिल्ह्यातील कोरोना मुक्त रुग्णांची संख्या आता 500 72 इतकी झालेली आहे अर्थात कोणाच्या संसर्गावर मात केलेल्या रुग्ण संख्येने पन्नास हजाराचा महत्त्वाचा टप्पा पार केल्याचे दिसून येत आहे.
जळगाव जिल्ह्यात प्रारंभीच्या काळात कोरणा रुग्णांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली होती. याच प्रमाणे जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची मृत्यूचे प्रमाण देखील लक्षणीयरीत्या होते. एक वेळ तर अशी होती की जिल्ह्यातील मृत्युदर फरक तब्बल साडेबारा टक्के इतका वाढलेला होता. यामुळे जिल्ह्याचे नाव देशभरात गाजले होते. यातच जिल्हा रुग्णालयातील काही घटनांमुळे जळगावची व्यापक प्रमाणावर बदनामी झाली होती. यानंतर मात्र प्रशासकीय उपाययोजनांमुळे कोरोना चा संसर्ग तर आटोक्यात आलाच पण यासोबत मृत्युदर देखील लक्षणीय प्रमाणात घेतलेला आहे.