कोरोनाच्या नव्या व्हेरियंटने तज्ज्ञांना धडकी

नवी दिल्ली वृत्तसंस्था | एकीकडे देशात कोरोना आटोक्यात येत असतांना बर्‍याच देशांमध्ये याच्या नव्या व्हेरियंटने नव्या लाटेचा धोका वाढविला आहे. या नवीन व्हेरियंटचे तब्बल ३० वेळेस म्युटेशन होत असल्याचे दिसून आल्याने जागतिक आरोग्य संघटनेने तातडीची बैठक बोलवली आहे. तर केंद्र सरकारनेही याची दखल घेत सतर्कतेचे आवाहन केले आहे.

अनेक देशांत कोरोनाचे रुग्ण कमी होऊ लागले होते, परंतू आता या व्हेरिअंटने जगाला भितीच्या छायेत लोटले आहे. नवीन व्हेरिअंट साऊथ आफ्रिकेत सापडला   असला तरी तो वेगाने प्रसार करत असल्याचे सांगितले जात आहे. धक्कादायक बाब म्हणजे या व्हेरिअंटचे आजवर ३० हून अधिकवेळा म्युटेशन झाले आहे. या व्हेरिअंटला बी.१.१.५२९ नाव देण्यात आले आहे.

या संदर्भात केंद्राने सर्व राज्य सरकारांना परदेशातून विशेषतः या तीन देशांतून येणार्‍या प्रवाशांची कडक तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत.  केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी राज्यांना पत्र पाठवले आहे. त्यात म्हटले आहे की, आरोग्य संघटनेकडून कडून अशी माहिती देण्यात आली आहे की, कोविड-१९ चा नवीन व्हेरिएंट बी १.१५२९ ची बोत्सवानामध्ये ३, दक्षिण आफ्रिकेत ६ आणि हॉंगकॉंगमध्ये १ रुग्णाची नोंद झाली आहे. शास्त्रज्ञांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हा नवा व्हेरिएंट मोठ्या प्रमाणात म्युटेशन करू शकतो.

सतत रुप बदलण्यामुळे थकज सोबतच शास्त्रज्ञांचे टेन्शन वाढले आहे. ३० पेक्षा जास्त वेळा रूप बदलणे ही सर्वात धोकादायक गोष्ट आहे. दुसर्‍या लाटेमध्ये, डेल्टा आणि डेल्टा प्लस व्हेरियंट्सचे असेच उत्परिवर्तन झाले आणि ते घातक ठरले. यातच आता हा नवीन व्हेरियंट आढळून आले आहे. याच्या निराकरणासाठी जागतिक आरोग्ंय संघटनेच्या तांत्रिक सल्लागार गटाने एक महत्त्वाची बैठक बोलावली आहे.

Protected Content