दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | दिल्लीतील पुढील मुख्यमंत्री कोण असणार आहे यावर सस्पेन्स वाढला आहे. दरम्यान, मंगळवारी १७ सप्टेंबरला याचे चित्र स्पष्ट होईल. पुढील मुख्यमंत्रीपदाच्या नावावर मोहोर लावण्यासाठी सोमवारी आम आदमी पक्षाच्या पॉलिटिकल अफेयर्स कमिटीची बैठक झाली. या बैठकीनंतर दिल्लीचे मंत्री सौरभ भारद्वाज यांनी सांगितले की पुढील मुख्यमंत्री कोण असेल याची घोषणा उद्या केली जाईल.
सौरभ भारद्वाज म्हणाले, आज मुख्यमंत्री अरविद केजरीवाल यांनी बैठक बोलावली होती. एलजी साहेबांकडून मंगळवार संध्याकाळपर्यंतचा वेळ मिळाला आहे. नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावावर आज चर्चा झाली.काल मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली होती की ते मंगळवारी राजीनामा देतील. आज कॅबिनेट बैठकीत ते उपस्थित होे. नेत्यांशी आणि मंत्र्यांसोबत नव्या मुख्यमंत्रीपाबाबत चर्चा करण्यात आली आणि फीडबॅक घेतला.यासोबतच ते म्हणाले की सीएमची मंत्र्यांसोबत वन टू वन मीटिंग झाली. वन टू वन मीटिंगमागचे कारण हे की कोणालाही एकमेकांनी सुचवलेले नाव समजणार नाही.
मंगळवारी सकाळी साडे अकरा वाजता होईल.यात नव्या मुख्यमंत्रीपदाच्या नावावर चर्चा होईल. आबकारी निती प्रकरणात जामीनावर तिहार तुरुंगातून सुटका झाल्यानंतर आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी रविवारी घोषणा केली की ते ४८ तासांच्या आत राजीनामा देतील आणि दिल्लीत लवकर निवडणुकीची मागणी करतील.