चैतन्य तांडा येथे ”माझे कुटुंब, माझे जबाबदारी” मोहीमेस सुरुवात

चाळीसगाव प्रतिनिधी । जिल्हाधिकारी यांनी नुकतीच जिल्हाभरात ”माझे कुटुंब, माझी जबाबदारी” हि मोहिम राबविण्याचे निर्देश दिलेले आहेत. याच पार्श्वभूमीवर तालुक्यातील चैतन्य तांडा येथे आज या मोहिमेला सुरुवात करण्यात आले असून प्रति कुटूंबाची माहिती संकलित केली जाणार आहे.                    

कोरोनाच्या पहिल्या लाटेत माझे कुटुंब माझी जबाबदारी हि मोहिम राबविण्यात आली. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यात बदल करून मी जबाबदार ह्या मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे. कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी नुकतीच जिल्हाभरात माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेला सुरुवात केली आहे. या पाश्र्वभूमीवर चाळीसगाव तालुक्यातील चैतन्य तांडा क्र. ४ येथे १२ ते १७ जुलै दरम्यान मोहीम राबविण्यात येणार आहे. यावेळी माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेचे उद्घाटन लोकनियुक्त सरपंच अनिता राठोड यांनी केले. यावेळी  डॉ. संदीप पाटील, आरोग्य सेवक पवार, आशा सेविका कविता जाधव, करगाव आरोग्य उपकेंद्राचे डॉ. घनश्याम राठोड व विकास सोसायटीचे माजी चेअरमन दिनकर राठोड आदी उपस्थित होते.

 

Protected Content