वर्षभरापुर्वी गहाळ झालेला मोबाईल दिला परत

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  गेल्या वर्षभरापुर्वी शिवकॉलनी परिसरातून मोबाईल गहाळ झाला होता. हा मोबाईलचा रामानंद नगर पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्याने शोध घेवून तो मूळ मालकाला परत दिला.

शहरातील शिवकॉलनी परिसरात शुभांगी दादाराव वखरे यांचा महागाडा मोबाईल ६ जून २०२२ रोजी गहाळ झाला होता. या परिसरातून जाणाऱ्या एकाला गहाळ झालेला तो मोबाईल सापडला. परंतु अनेक महिने त्या व्यक्तीने तो मोबाईल सुरु केला नव्हता. परंतु गेल्या काही दिवसांपुर्वी सापडलेल्या मोबाईलमध्ये सीमकार्ड टाकल्यानंतर तो ॲक्टीव्ह झाल्यानंतर रामानंद नगर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हेमंत कळस्कर यांनी गहाळ झालेला मोबाईल ताब्यात घेतला. त्यानंतर बुधवारी तो मोबाईल शुभांगी वखरे यांच्या पतीकडे सुपूर्द केला.

Protected Content